सुवा : फिजी देशाला विन्स्टन या अत्यंत शक्तिशाली वादळाच्या बसला. या फटक्‍यानंतर आता येथील नुकसानाची चाचपणी आणि मदतकार्य सुरु करण्यात आले. या वादळामुळे एक नागरिक मृत्युमुखी पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विन्स्टनमुळे वाहिलेल्या वाऱ्यांचा वेग ताशी ३२० किमीपेक्षाही जास्त होता; तसेच किनारपट्टीवर सुमारे ४० फूट उंचीच्या लाटा उसळल्या. या आव्हानाचा सामना करण्यासाठी येथील सरकारने किमान साडेसातशे मदतकेंद्रांची स्थापना केली आहे. राष्ट्रीय पातळीवर संचारबंदी लागू केली होती. या वादळामुळे झालेल्या नुकसानाचा अद्यापी आढावा घेण्यात येत आहे. 


फिजीच्या इतिहासामधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ म्हटलं जात आहे. यामुळे देशातील हजारो घरे अक्षरश: उध्वस्त झाली. याचबरोबर, देशामधील काही गावे पूर्णत: उध्वस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे.