इस्तंबूल : तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये फुटबॉलच्या मैदानाबाहेर उभ्या असलेल्या दोन कारमधये झालेल्या स्फोटात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 166 जण जखमी झालेत. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.


बेसिक्टस मैदानात रात्री सॉकरची मॅच सुरु होती. ही मॅच संपल्यानंतर मैदानाबाहेर हे स्फोट झालेत. हे दोन्ही हल्ले आत्मघातकी असल्याची माहिती तपास अधिका-यांनी दिली आहे. या स्फोटानंतर हल्लेखोरांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबारही केला होता अशी माही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला केल्याचं बोललं जातं आहे.