पिट्‌सबर्ग : रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांचा धडाका लावला आहे. ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन हा जगातील सर्वांत मोठा आणि सर्वांत चतुर उद्धट देश आहे, असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे, तर जपान, जर्मनी, सौदी अरेबिया आणि इराणवर टीका करणाऱ्या ट्रम्प यांनी चीनवरही आगपाखड केली. 


चीन बौद्धिक संपदेची चोरी करत असून, तिथे व्यवसाय करणाऱ्या अमेरिकेतील कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात कर लादत आहे. एकूणच चीन हा सर्वांत मोठा आणि अतिशय चतुर देश आहे, मेक्‍सिको ही चीनचीच लहान आवृत्ती आहे. नो


व्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पिट्‌सबर्ग हे महत्त्वाचे राज्य मानले जाते.  पिट्‌सबर्ग येथे आपल्या समर्थकांसमोर बोलताना ट्रम्प म्हणाले, चीन आपली उत्पादने अमेरिकेत आणून टाकत आहे.