वॉशिंग्टन : अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. भूमिपुत्रांसाठी काम करणार आपण काम करणार आणि अमेरिकेला पुन्हा तिचं वैभव प्राप्त करून देणार असं ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणामध्ये सांगितलं. तसंच दहशतवादाचं समूळ उच्चाटन करून अमेरिकेला सुरक्षित बनवणार असल्याचंही ट्रम्प म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शपथविधी सोहळ्याला तेराशे कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता. आत्तापर्यंतचा हा सगळ्यात महागडा शपथविधी सोहळा होता. वॉशिंग्टनमधल्या कॅपिटल बिल्डिंगमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. ट्रम्प शपथविधी सोहळास्थळी पोहोचत असताना, त्यांच्या सरकारी गाड्यांच्या ताफ्याला रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून लोकांनी मानवंदना दिली.


दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा सुरु होण्याआधी, वॉशिंग्टनमध्ये निदशर्नं करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला.