वेंझाऊ : नशेत असलेल्या एखाद्या महिलेने भर रस्त्यात आपले स्वत:चे कपडे काढले असल्याचा प्रकार चीनमध्ये घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेथे पोलिसांनी थांबविल्यानंतर महिलेने भररस्त्यातच आपले कपडे काढण्यास सुरुवात केली. 


दारूच्या नशेत चालवत होती गाडी


डेली मेल ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील वेंझाऊ परिसरात टॉपलेस अवस्थेत गाडी चालविणा-या एका कपलला पोलिसांनी रोखले. पोलिसांनी आपल्याला थांबवले हे सहन न झाल्याने दारूच्या नशेत असलेल्या महिलेने रस्त्यात कपडे काढण्यास सुरुवात केली आणि एवढेच नाही तर पोलिसांवरही हल्ला चढवला.


टॉपलेस होते पती पत्नी


दारुच्या नशेत धुंद असलेल्या ३० वर्षीय शियाओ चेन-ली आणि तिचा पती सींग सेह यांना पोलिसांनी टॉपलेस अवस्थेत गाडी चालवत असल्यामुळे थांबविले. यानंतर आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. 


पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात दारुच्या नशेत असलेल्या महिलेने रस्त्यातच कपडे काढण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि कारवाई केली.