काठमांडू : नेपाळ शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाने हादरले. रात्री १०.१० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केलवर मोजण्यात आली.  भूकंपाचे केंद्रबिंदू नेपाळ होते. या भूकंपामुळे नागरिकांनात घबराट होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळमध्ये शुक्रवारी वेगवेगळ्या भागांत भूकंपाचे हलके झटके बसत होते. या भूकंपाचे हादरे बिहार, पश्‍चिम बंगालचा उत्तरेकडील भाग, झारखंड आणि सिक्किमच्या काही भागांतही जाणवले. मात्र जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.


गेल्यावर्षी एप्रिलमध्ये जोरदार भूकंपाने नेपाळमध्ये होत्याचे नव्हते झाले. या भूकंपात जवळपास ८००० लोकांचा मृत्यू झाला होता.