क्विटो : इक्वाडोरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या आता ४१३ वर पोहचलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ४१३ मृतदेह हाती लागलेत. यापूर्वी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या साडे तीनशेवर पोहचली असल्याचं सांगण्यात येत होतं. 


शनिवारी सायंकाळी इक्वाडोरमध्ये ७.८ तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या भूकंपात बचावलेले लोक आपल्या आप्तेष्टांना शोधण्यासाठी मलबा हातानचं काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मलब्याखाली दबलेल्यांपैंकी आता कुणी जिवंत असण्याची शक्यता धुसर झालीय.