कॅलिफोर्निया  : अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा कॅम्पस गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या विद्यापीठाची वार्षिक परीक्षा सुरू आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यात एका व्यक्तीची हत्या झालीये, तर हल्लेखोरानंही आत्महत्या केलीये. या घटनेनंतर शेकडो पोलीस कॅम्पसमध्ये दाखल झाले. परीक्षेमुळे आधीच दडपणाखाली असलेले विद्यार्थी या घटनेनं हादरून गेलेत. 


गोळीबाराचा आवाज येताच मिळेल तिथं विद्यार्थी लपून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी दिवसभरासाठी कॅम्पस रिकामा केला. आता हळूहळू विद्यार्थी कॅम्पसमध्ये परत येण्यास सुरूवात झाली असली दिवसभर एकही वर्ग भरणार नाही. 


हल्लेखोर आणि बळी गेलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. विद्यापीठात आजमितीस ४३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे.