मुंबई : कँसर झाल्यामुळे अमेरिकेतील थॉमस मॅनिंग याचं गुप्तांग ४ वर्षापूर्वी शरिरापासून वेगळं करण्यात आलं होतं. थॉमसला नेहमी काही तरी कमी असल्याचं वाटत होतं त्यामुळे त्याने डॉक्टरांशी भेटून गुप्तांगाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्यास सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रांसप्लांटचा उपाय थॉमसला सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण अजूनपर्यंत जगात कधीही अशा प्रकारचं ट्रांसप्लांट केलं गेलं नव्हतं. त्यामुळे डॉक्टरही या ऑपरेशनच्या बाबतीत थोडे घाबरलेल्या स्थितीत होते. तरीही मेसाचुएट्सच्या  जनरल रुग्णालयात डॉक्टर कर्टिस सेच्रुलो आणि डिकेंन एस को यांनी १५ इतर तज्ञ लोकांचा सल्ला घेतला. यासाठी त्यांनी ३ वर्ष शोध कार्य केलं. इंग्लंडच्या एका अंगदान करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणइ १५ तासाच्या ऑपरेशननंतर थॉमसचं पेनिस ट्रांसप्लांट करण्यात आलं.


डॉक्टर कर्टिस सेच्रुलो आणि डिकेंन एस को यांचं म्हणणं आहे की, हा जगातील पहिला ट्रांसप्लांट आहे. ही सर्जरी यशस्वी राहिली. काही दिवसातंच ते सामान्य लोकांसारखी जीवन जगू शकतात.