फ्लोरिडा : हसणाऱ्या या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. वडिलांच्या बाईकचं हेल्मेट आणि ग्लोव्हजवर ही मुलगी झोपली आहे, पण या मुलीबद्दलची बातमी जीवाला चटका लावणारी आहे. या मुलीचा फोटो तब्बल 78 हजार जणांनी शेअर केला आहे, तर तीन लाख एकोणपन्नास हजार जणांपेक्षा जास्त जणांनी हा फोटो लाईक केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ऑब्रे असं या चिमुकलीचं नाव आहे. ऑब्रेचे वडिल हेक्टर डॅनियल फेरर अल्वारेजचा फ्लोरिडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. हेक्टर हा 25 वर्षांचा युवक होता. ऑब्रेच्या जन्माच्या एका महिन्यातच त्याचा मृत्यू झाला.


 


नुकत्याच जन्मलेल्या ऑब्रेसाठी तिच्या वडिलांनी फोटो शूट करायचं ठरवलं होतं, पण त्याची ही इच्छा अर्धवटच राहिली, पण ऑब्रेच्या आईनं हेक्टरची ही इच्छा पूर्ण केली.


हेक्टरचं बाईक आणि ऑब्रेवर खूप प्रेम होतं, त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी फोटोशूट केल्याची प्रतिक्रिया ऑब्रेच आई केथ्रिन विलियम्सनं दिली आहे. ऑब्रे मोठी झाल्यावर हे सगळे फोटो मी तिला दाखवीन आणि सगळ्या जगानं तुझ्यासाठी आणि तुझ्या वडिलांसाठी प्रार्थना केली हे तिला सांगिनं असंही केथ्रिन म्हणाली आहे. 



या मुलीच्या भविष्यासाठी GoFundMe नावाचं पेज तयार करण्यात आलं आहे. या पेजवर ऑब्रेच्या शिक्षणासाठी डोनेशन द्यायचं आवाहनही करण्यात आलं आहे.