नवी दिल्ली : जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचं नाव कायम आहे. (100 जणांची यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थ आणि उद्योगविषयक माहिती देणाऱ्या फोर्ब्स या नियतकालिकानं जगभरातल्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. यादीत सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहण्याची करामत त्यांनी केली आहे. तसेच गेल्या २२ वर्षांत तब्बल १७ वेळा गेट्स हेच जगातले सर्वात श्रीमंत ठरलेत.(100 जणांची यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा)


गेट्स यांची आजमितीस संपत्ती आहे ७५ अब्ज डॉलर्स. गतवर्षीपेक्षा यात ५७० दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे. रिलायन्सचे मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत भारतीय असून जगात त्यांचा ३६वा क्रमांक आहे. अंबानी यांच्या संपत्तीची मोजदाद जातेय २१ अब्ज डॉलर्सच्या घरात. १ हजार ८१० अब्जाधीशांच्या यादीत ८४ भारतीय आहेत. (100 जणांची यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा)