नवी दिल्ली : जॉर्जियामध्ये एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान वादाचं पर्यावसन हाणामारीत पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका प्रसिद्ध टीव्ही चॅनलवर रिफॉर्मिस्ट पार्टीचे नेते इरेक्ली घ्लोंती आणि इंडस्ट्रीयल पार्टीचे नेते जाजा अघलाजे यांच्यात चर्चा सुरू होती. 


रशियाच्या विचारधारेला पाठिंबा देण्यावरून दोघांचाही वाद सुरू झाला. त्यानंतर भर कार्यक्रमात एकानं दुसऱ्याच्या अंगावर सरळ पाण्यानं भरलेला ग्लासचं उलटा केला. त्यानंतर त्यानं हातही उचलण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार अँकरनं थांबवण्याचा प्रयत्न केला... पण, तिचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि हा कार्यक्रम मध्येच थांबवण्यात आला... 


हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय...