अफगाणिस्तान : केवळ एक बकरी, भात, तेल आणि साखर यांच्याबदल्यात एका ५५ वर्षीय थेरड्याशी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा विवाह लावणाऱ्या बापाला अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, आपल्या कुटुंबियांच्या पालनपोषणासाठी त्याला आपल्या मुलीचं लग्न एका म्हाताऱ्याशी करून द्यावं लागलंय. 


सहा वर्षांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या इसमाचं नाव सय्यद अब्दुल करीम असं आहे. त्यालाही अटक करण्यात आलीय. आपल्या नातेवाईकांना मात्र त्यानं ही आपली मुलगी असल्याचं खोटं सांगितलं होतं. 


मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणार नाही, असा आपल्या जावयानं शब्द दिल्याचंही मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. 


अफगाणिस्तानतला महिला ब्युरो या प्रकरणाची चौकशी करत आहे. मुलीच्या वडिलांकडून पालकांचा अधिकार काढून घेण्यात आलाय. सध्या तिचा ताबा तिच्या आईकडे आहे. 


उल्लेखनीय म्हणजे अफगाणिस्तानात मुलींच्या लग्नाचं कमीत कमी वय १६ तर मुलांसाठी १८ वर्ष आहे. परंतु, संयुक्त राष्ट्रानं केलेल्या एका सर्व्हेनुसार जवळपास ४६.४ टक्के विवाह मुलं अल्पवयीन असतानाच केले जातात.