२४ लाखांच्या टँकमधून निघालं १६ करोडोंचं सोनं!
एखाद्या वाहनाच्या किंवा टँकच्या फ्युएल टाकीमधून सोनं निघाल्याची बातमी कधी तुम्ही वाचलीय... पण, अशी घटना प्रत्यक्षात घडलीय... लंडनच्या एका व्यक्तीला तब्बल १६ करोडोंच्या सोन्याचा लाभ झालाय.
नवी दिल्ली : एखाद्या वाहनाच्या किंवा टँकच्या फ्युएल टाकीमधून सोनं निघाल्याची बातमी कधी तुम्ही वाचलीय... पण, अशी घटना प्रत्यक्षात घडलीय... लंडनच्या एका व्यक्तीला तब्बल १६ करोडोंच्या सोन्याचा लाभ झालाय.
सेनेचं सामान आपल्याकडे असावी अशी इच्छा असणाऱ्या निक मिड यानं एक इराकी टँक विकत घेतला होता. या टँकमध्ये त्याला तब्बल २० लाख पाऊंड म्हणजेच जवळपास १६ करोड रुपयांचं सोनं सापडलंय. निक यानं हा टँक जवळपास ३० हजार पाऊंड म्हणजेच जवळपास २४ लाख रुपयांना विकत घेतला होता.
प्रामाणिकपणा दाखवत ५१ वर्षीय निकनं हे सोनं पोलिसांच्या स्वाधीन केलंय. १९९० साली इराकनं कुवैतवर हल्ला केला होता तेव्हा इराकी सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणात सोनं लुटलं होतं. त्यावेळी, कदाचित सैनिकांनी टँकच्या फ्युएल टाकीला कापत त्यामध्ये सोनं भरलं असावं... पण, तेव्हा अमेरिकेनं इराकी सेनेवर हल्ला केल्यानं हे सोनं आपल्यासोबत नेण्यासाठी त्यांना अपयश आलं असावं, असं निकनं म्हटलंय.