मॉस्को : टॉयलेटपासून भिंती आणि फर्निचर सोन्यापासून बनविण्यात आलेय. सोन्याने मढवलेले हे घर विकण्यासाठी रेडी आहे. या घराची किंमत ६३ कोटी रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्यक्तीला जग फिरण्याचा शौक आहे. त्यामुळे त्याने सोन्याचे घर बनविण्याचा निर्धार केला. त्याने या सोन्याच्या घरात जगातील सर्वात महागड्या वस्तू आणून सजविण्यात आले आहे. आता या घराचा मालक हे घर विकण्यासाठी तयार आहे. तो ग्राहकाच्या प्रतिक्षेत आहे.


रशियातील मगादन शहरात मध्यभागी हे सोन्याचे घर आहे. चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सोन्याची रुम आहे. या घराच्या खोलीत अनेक प्रकारच्या वस्तू दिसतात. सर्व सोन्याने मढविलेल्या आहेत. रोम, इजिप्त, अफगानिस्तान, अमेरिका आदी देशांतील झलक या घरात पाहायला मिळते. संपूर्ण घर हे सोन्याने बनविण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी पिवळ्या रंगाच्या शेड्स दिसतील. सोन्याच्या भिंती असून टॉयलेटही सोन्याचे आहे.


वॉश बेसिनपासून ते फर्निचरवरती सोन्याचा मुलामा दिसून येत आहे. हे घर खरेदी करण्यासाठी लोक येत आहेत. यात फाईन आर्टबाबत लोकांना उत्सुकता आहे. या घरात तीन खोल्या आहेत. मात्र, घराशेजारील स्थिती चांगली नसल्याने घर खरेदी करण्यासाठी लोक कमी उत्साह दाखवतात. घराशेजारी एक जेल आहे.