मुंबई : जगातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठं सर्चइंजिन म्हणून ओळख असलेल्या गूगलला आज १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. गूगल आज 18 वा वाढदिवस साजरा करत आहे ययानिमित्त त्यांनी खास डुडल तयार केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गूगलची स्थापना दिवसावरुन अजून वाद आहे. पण गूगलने २००६ मध्ये २७ सप्टेंबरला वाढदिवस साजरा होता त्यानंतर याच दिवसापासून डुडलच्या माध्यमातून देखील वाढदिवस साजरा करण्यात येतो. 1998 मध्ये गूगलने पहिला वाढदिवस साजरा केला होता.


जगात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास ती गूगलवर सहज उपलब्ध होते. गूगलचा जगभरात मोठा उपयोग केला जातो. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन हे गूगलचे संस्थापक आहेत. आधी याचं नाव 'बॅकरब' असं ठेवण्यात आलं होतं पण त्यानंतर ते गुगल असे करण्यात आलं.


गूगल शब्द हा गूगोल googol या शब्दापासून घेण्यात आला होता. गूगोल हा गणितात वापरला जाणार शब्द आहे. गूगोल असंच नाव हे नोंदवण्यात येणार होतं पण लिहिण्यात चूक झाल्याने googol ऐवजी google असं नाव नोंदवलं गेलं.


पाहा व्हिडिओ