इस्लामाबाद : पाकिस्तानला युद्ध करुन काश्‍मीर जिंकण्यात यश येणार नाही, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी आज (सोमवार) केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पाकिस्तान हा युद्ध करुन काश्‍मीर जिंकू शकणार नाही, असे मला वाटते. युद्ध जिंकण्याची आपली क्षमता नसल्याने पाकिस्तानपुढील एकमेव पर्याय हा चर्चेचा आहे. मात्र तणावपूर्ण परिस्थितीमध्ये दोन देशांमधील समस्यांचे निराकरण होणे अशक्‍य आहे,‘‘ असे खार म्हणाल्या. 


खार या 2011 ते 2013 या काळामध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या. खार यांच्या कार्यकाळात त्यांनी भारत पाकिस्तान संबंध सुरळित करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.