न्यूयॉर्क : जगात फार क्वचित माणसे असतील ज्यांना आईस्क्रीम आवडत नसेल. विविध प्रकारची अनेक आईस्क्रीम जगभरात मिळतात. तुम्हीही अनेक आईस्क्रीमचे प्रकार खाल्लेल असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्ही कधी सोन्याचे आईस्क्रीम खाल्लेय का? न्यूयॉर्कमधल्या ‘सेरेनड्रिपीटी ३’ या कॅफेत अशाच प्रकारचे आईस्क्रीम मिळते. या आइस्क्रीममध्ये ५ ग्रॅम सोने टाकले जाते. 


या सोन्याच्या आइस्क्रीमची किंमतही सोन्यासारखीच आहे. एका स्कूपसाठी तब्बल ५४ हजार रुपये द्यावे लागतात. फ्रोझन हाँटे चॉकलेट असं या आईस्क्रीमचे नाव आहे. तसेच गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या आईस्क्रीमचा समावेश आहे.


या आईस्क्रीममध्ये तब्बल २८ प्रकारचे चॉकलेट वापरले जाते. तसेच २३ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.