वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिलाडेल्फियामध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय डेमोक्रॅटिक पक्षाच्या कन्व्हेशनच्या शेवटच्या दिवशी हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डॉनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला केला.  


बंदूका बनवणाऱ्यांच्या खिशात असणारा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला परवडणार नाही असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला केला.  अमेरिकच्या निवडणुकीत देशात बोकाळलेल्या गन कल्चरचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. त्यापार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात डॉनल्ड ट्रम्प यांचं भाषण झाले.


 जवळपास 70 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी गन कल्चरबद्दल एक चकार शब्द काढला नाही. त्या मुद्द्यावरून क्लिंटन यांनी  जोरदार टीकास्त्र सोडले.