फिलाडेल्फिया : डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांचं  जोरदार समर्थन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेला सध्याच्या परिस्थितीत हिलरी यांच्याइतका योग्य अध्यक्ष  मिळणार नाही, अशी स्तुतीही देखील बराक ओबामा यांनी यावेळी केली.या वेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही जोरदार टीका झाली.


बराक ओबामा यावर बोलताना म्हणाले, अमेरिकेचं बिल क्‍लिंटन, मी यांच्यानंतर आता हिलरी हे एक चांगलं नेतृत्व असेलं. हिलरी यांच्या समर्थनासाठी येथे झालेल्या सभेत ओबामा यांनी सत्तेची सूत्रे हिलरी यांच्याकडे सोपविण्यास तयार असल्याचे सांगितले.