इस्लामाबाद :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना साऊदी जाऊन ट्रम्प यांच्याशी बोलण्याची संधी देण्यात आली नाही. पाकिस्तानी मीडियाने ट्रम्प समोर झालेल्या अपमानाबद्दल शरीफ यांच्यावर टीकेची झोड घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान मीडियानुसार इस्लामिक स्टेटच्या समिटमध्ये नवाज शरीफ हे एकटे पडले होते आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर त्यांना आपले मत मांडू दिले नाही. 


पाकिस्तानी वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलने नवाज शरीफ यांच्या साऊदी यात्रेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. शरीफ यांची कुठेच दखल घेतली गेली नाही, तर त्यांना तेथे जाण्याची गरज काय होती. 


द डेली पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार समिटमध्ये नवाज शरीफ एकटे पडले होते. त्यांनी यावेळी भाषणाची तयारीही केली. पण त्यांना भाषणासाठी बोलवलेच नाही. 


जगातील १४ मुस्लिम देशांमध्ये पाकिस्तानकडेच फक्त अणू बॉम्ब आहे, पण असे असूनही पाकिस्तानाला ट्रम्पसमोर कोणतेही महत्त्व देण्यात आले नाही. 



ट्रम्पने पाकिस्तानचा उल्लेख टाळला...


ट्रम्प यांनी आपल्या भाषणात एकदाही नवाज शरीफ यांचा उल्लेख केला नाही.. नवाज शरीफ यांच्यासमोर भारताला दहशतवाद पीडित देश म्हटले. या बैठकीत ट्रम्प यांनी मुस्लिम देशांच्या नेत्यांना एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करण्याचे आवाहन केले.