मुंबई : जगातली आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार आणि महिन्याचा पगार किती असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का. पिचाई यांच्या पगाराचे आकडे आकडे ऐकून तुमचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिचाई यांचा वार्षिक पगार तब्बल २०० मिलियन डॉलर म्हणजेच १२.८५ अब्ज रुपये इतका आहे. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट असून सरासरी काढल्यास पिचाई यांना महिन्याला १०० कोटी रुपये मिळालेत. वेतन म्हणून एवढी रक्कम असलेले पिचाई हे जगातले एकमेव व्यक्ती आहेत.


पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली होती. सीईओपदी मिळालेली बढती आणि गुगलच्या अनेक सेवा यशस्वीरित्या सुरु केल्याबद्दल पिचाई यांना हा गलेलठ्ठ पगार देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.


पिचईंच्या नेतृत्वातच गुगलचा जाहीरात आणि यूट्यूब व्यवसाय प्रचंड वाढलाय. तसंच गुगलला मशिन लर्निंग, हार्डवेअर, क्लाऊड कॉम्प्युटिंग क्षेत्रातही गुंतवणूक करणं शक्य झालंय. त्यामुळेच त्यांच्या पगारात ही घसघशीत वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय.