इस्लामाबाद  : पाकिस्तानात १९ वर्षानंतर जनगणना सुरू झाली असली, तरी जनगणेनेमागे अनेक रंजक गोष्टी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी  पाकिस्तानातील एका डॉक्टरला ३ पत्नी आणि ३३ मुलं असल्याचे दिसून आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता एका ड्रायव्हरला अर्धाडझन पत्नी आणि ५४  मुलं असल्याचे जनगनणेवेळी समोर आले आहे. बलुचिस्तानमधील नोशकी येथे हाजी अब्दुल मजीद मेंगल नावाच्या या व्यक्तीच्या ६ पत्नी आणि ५४ मुलं आहेत. 


आता जनगणनेच्या निमित्ताने सरकारी अधिकारी या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. ही जनगणना १५ मार्चला सुरू झाली असून ती २५ मे पर्यंत सुरू राहणार आहे.


ही माहिती कळताच जनगणना अधिकारीही चक्रावून गेले. सध्या तो आपल्या ४ पत्नी आणि ४२ मुलांसमवेत राहतो. त्याच्या २ पत्नी आणि १२ मुलांचे निधन झाले आहे. 


हाजी अब्दुलच्या मुलांमध्ये २२ मुले आणि २० मुली आहेत. त्याच्या नातवंडांची संख्या जोडली तर त्याच्या कुटुंबामध्ये एकूण १५० जण आहेत. 


पाकिस्तानातील सर्वात मोठा परिवार ७० वर्षीय हाजीचा परिवार  ठरला आहे. हाजीचे गाव क्वेटापासून १३० किलोमीटरवर अफगानिस्तानच्या सीमेनजीक आहे.