सैन्य शक्तीत चीनपेक्षा पुढे अमेरिका, भारत-पाकिस्तानचा क्रमांक कितवा?
जगभरात आज प्रत्येक देश शस्त्रास्त्रांच्याबाबतीत शक्तीशाली दाखविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण सैन्य शक्तीचा हिशेब लावला तर आजही अमेरिका जगात सर्वात शक्तीशाली देश आहे. अमेरिका एकूण चीन आणि रशियाच्या सैन्य शक्तीच्या तिपट्ट खर्च हा आपल्या संरक्षण खर्चावर करत आहे.
नवी दिल्ली : जगभरात आज प्रत्येक देश शस्त्रास्त्रांच्याबाबतीत शक्तीशाली दाखविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण सैन्य शक्तीचा हिशेब लावला तर आजही अमेरिका जगात सर्वात शक्तीशाली देश आहे. अमेरिका एकूण चीन आणि रशियाच्या सैन्य शक्तीच्या तिपट्ट खर्च हा आपल्या संरक्षण खर्चावर करत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल रँकिंगमध्ये ही माहिती समोर आली आहे. जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे. भारत एकूण ५१ मिलियन डॉलर खर्च करीत आहे.
अमेरिका आपल्या संरक्षण खर्चावर सुमारे ६०० बिलियन डॉलर खर्च करीत आहे. तर रशिया एक वर्षात ५४ बिलियन डॉलरचा खर्च करतो. तर चीन १६१ बिलियन डॉलर खर्च करतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी स्पष्ट केले की संरक्षण बजेटवर लक्ष देणार आहे. त्यामुळे त्यांनी ५४ बिलीयन डॉलर खर्च वाढविला आहे.
भारत चौथ्या स्थानावर
सैन्य शक्तीच्या या लिस्टमध्ये एकूण १०६ देशांचा समावेश होता. त्यात अनेक आकडेवारी आणि तथ्यांचा समावेश आहे. यात संरक्षण बजेट, सैन्य शक्ती आणि शस्त्रास्त्रांची संख्या लक्षात घेतली आहे. जगभरातील सैन्याचे विश्लेषण करणारी वेबसाईट फायर पॉवरनुसार दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या स्थावर चीन, चौथ्या स्थानावर भारत आणि पाचव्या स्थानावर फ्रान्स आहे. या लिस्टमध्ये १३ व्या स्थानावर पाकिस्तान आहे.