नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पाकिस्तानला मिळणाऱ्या मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) च्या दर्जाबाबत बैठक बोलावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट आहे. भारत सरकार जे ही पाऊल उचलणार आहे त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहे. भारताने जर पाकिस्तानकडून हा दर्जा काढून घेतला तर त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थितिवर याचा मोठा परिणाम होणार आहे. पाकिस्तानला यापुढे मग कोणत्याही मुद्द्यांवर भारताची समर्थन नाही मिळणार.


एमएफएन दर्जा दिल्यानंतर दुसरा देश हा आश्वत राहतो की त्याला व्यापारात कोणतंही नुकसान होणार नाही. भारताने पाकिस्तानला १९९६ मध्ये एमएफएनचा दर्जा दिला होता. यामुळे पाकिस्तानला अधिक आयात कोटा आणि कमी ट्रेड टेरिफ मिळत होतं. पाकिस्तानने मात्र भारताला एमएफएन दर्जा नाही दिला आहे.