`भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे`
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल.
नवी दिल्ली : अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल.
टेन्नेस्सी येथे जवळपास ५ हजार लोकांना संबोधित करत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. सोबतच त्यांनी जपान, चीन आणि मॅक्सिको या देशांकडून ही नोकऱ्या परत घेईन असं म्हटलं. तसं त्यांनी म्हटलं की अमेरिका आणि मॅक्सिको सीमेवर भींत बांधणार.