मुंबई : जगभरात 2015 साली झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धूम्रपान होतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय नियतकालिक 'द लॅनसेट'मध्ये प्रसिध्द झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अभ्यासानुसार, '2015 साली झालेल्या 64 लाख मृत्यूंपैकी 11 टक्के लोकांचे मृत्यू हे धूम्रपानाने झाले होते. कारण धूम्रपानाच्या सवयीमुळे शरीर कमकुवत होऊन व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.'

'धूम्रपान करणाऱ्या पुरुषांचं प्रमाण जास्त असलेल्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महिलांचं प्रमाण जास्त असणाऱ्या यादीत देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 5 टक्क्यांची वाढ झालेय आणि ही वाढ चिंताजनक असल्याचंही जीबीडीच्या अहवालात म्हटलंय.

जवळपास 195 देशांच्या धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या सवयींचा अभ्यास करून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे