नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारताने शांतपणे विचार करत आज पाकिस्तानात घूसून दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या कारवाईनंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे. तर पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक कारवाईवरुन फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सर्जिकल स्ट्राइक म्हणण्यास तयार नाही. दरम्यान, पाकिस्तानने आमचे केवळ दोन जवान मारले असल्याचे म्हटले आहे. तर 9 जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी याबाबत माहिती दिली.


भारताच्या सर्जिकल स्ट्राइक कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी LOC क्रॉस केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्यांना तसेच उत्तर देण्यात येईल, अशी उलटीबोंब मारली आहे.


शरीफ यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पाकिस्तान शांततेसाठी रक्त सांडत आहे. पाकिस्तानचा संयम अजून कायम आहे. भारतीय काश्मीर क्षेत्रात मानवाधिकारचे उल्लंघन होत, असल्याचे बोंब मारली आहे.