मुंबई : भारताने काही चायनिज मोबाईलवर बंदी घातली आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये सेक्युरीटी कोड नाही असे मोबाईल भारताने देशात बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाणिज्य मंत्री निर्मला सितारमन यांनी लोकसभेत याबाबत माहिती देतांना म्हटलं की, ज्या मोबाईलमध्ये आयएमईआय नंबर नाहीत असे मोबाईल आणि काही स्टील प्रोडक्टसवर बंदी घालण्यात आली आहे. 


सीतारमण यांनी म्हटलं की, चीनमुळे आपलं व्यापारात नुकसान झालं आहे. चीन भारतात दूरसंचार आणि उर्जा क्षेत्रातील वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात करतं. 


भारतात चीनला मोठ्या प्रमाणात बाजार मिळाल्यामुळे चांगला नफा होतो. पण या प्रोडक्ट्सची मागणी देखील भारतात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे चीनसाठी भारत हे मोठं मार्केट ठरलं आहे.