H1Bवर भारतीय आयटी कंपन्यांनी घेतली अमेरिका धार्जिणी भूमिका
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासानानं H1B व्हीसा विषयी घेतलेल्या कोठोर भूमिकेमुळे भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिका धार्जिणी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासानानं H1B व्हीसा विषयी घेतलेल्या कोठोर भूमिकेमुळे भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिका धार्जिणी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
इन्फोसिसने पुढच्या दोन वर्षात १० हजार अमेरिकन नागरिकांना नोकरी देण्याचा निर्णय घेतलाय. काल इन्फोसिसिचे सीईओ विशाल सिक्का यांनी याविषयीची माहिती काल इंडियाना प्रांततल्या इन्फोसिसच्या कार्यालयाला भेट दिल्यावर जाहीर केली.
इन्फोसिस आणि टीसीएस या भारतीय कंपन्या H1B व्हिसावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर इन्फोसिसनं हा निर्णय घेतला आहे.