अमेरिकेतल्या हल्ल्यावेळी या भारतीयानं वाचवले 70 जीव
अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पल्स नाईट गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता
फ्लोरिडा : अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पल्स नाईट गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता, तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. पण या हल्ल्यावेळी इमरान युसुफ या भारतीयानं दाखवलेल्या समय सुचकतेमुळे तब्बल 70 जणांचे जीव वाचले.
इमराननं आपला जीव धोक्यात घालून या क्लबचा मागचा दरवाजा उघडला आणि क्लबमधल्या 70 जणांना बाहेर काढलं. इमरान हा या क्लबमध्ये बाऊन्सरचं काम करतो.
जेव्हा मी गोळीबाराचा आवाज ऐकला तेव्हा हा एक मोठा हल्ला असल्याचं माझ्या लात आलं, त्यामुळे मी लगेच क्लबचं मागचं गेट उघडलं आणि क्लबमधल्यांना बाहेर पडायला सांगितलं असं इमराननं सांगितलं आहे.