काबूल : सामाजिक संस्थेत (एनजीओ) काम करणाऱ्या भारतीय महिला जुडिथ डिसुजा हिचे काबूलमध्ये अपहरण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री तिचे अपहरण करण्यात आले आहे.


जुडिथ डिसुजा कोलकातामधील आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क या संस्थेची महिला कर्मचारी आहे. दरम्यान, भारतीय दुतावास अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तर अफगाणिस्तानमधील प्रशासन जुडिथ डिसुजाच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहे.
 
जुडिथ डिसुजा ही कार्यालयाबाहेर उभी होती. त्यावेळी तिचे अपहरण करण्यात आले. तालिबानने हे अपहरण केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेय.