सुधरा नाहीतर पाकिस्तानात घुसून मारु- इराणची धमकी
भारत आणि अफगानिस्तानसोबत सीमेवर भिडण्याच्या प्रयत्न करणारी पाकिस्तानच्या सेनेला आता इराणही वैतागला आहे. इराणच्या सेनेने पाकिस्तानमध्यू घसून दहशतवाद्यांना मारण्याची धमकी दिली आहे.
नवी दिल्ली : भारत आणि अफगानिस्तानसोबत सीमेवर भिडण्याच्या प्रयत्न करणारी पाकिस्तानच्या सेनेला आता इराणही वैतागला आहे. इराणच्या सेनेने पाकिस्तानमध्यू घसून दहशतवाद्यांना मारण्याची धमकी दिली आहे.
इराणमधील सरकारी न्यूज एजेंसी इरनाने दिलेल्या माहितीनुसार इराण सेना प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाकरी यांनी म्हटलं आहे की, दुर्भाग्याने इराणला लागून असलेली पाकिस्तानच्या सीमेलगत दहशतवाद्यांसाठी ट्रेनिंग आणि हत्यारांसाठी सुरक्षित ठिकाण बनलं आहे. या दहशतवाद्यांनी भर्ती सउदी अरब करत आहे आणि त्याला अमेरिका समर्थन करत आहे. आम्ही हे सहन नाही करणार. आशा आहे की, पाकिस्तानचे अधिकारी जवाबदारी दाखवतील आणि दहशतवाद्यांची ही ठिकाणं नष्ट करतील. जर असं नाही झालं तर आम्ही जेथे कोठेही दहशतवद्यांची ठिकाणं असतील ते नष्ट करण्यासाठी आण्ही मागे नाही हटणार.
मागच्या बुधवारी पाकिस्तानशी लगत असलेल्या भागात सिस्तान आणि बलूचिस्तानमध्ये सुन्नी दहशतवाद्यांनी इराणच्या १० सुरक्षारक्षकांची हत्या केली होती. सुन्नी दहशतवदी संघटना जैश अल अदलने याची जबाबदारी स्विकारली होती.
पाकिस्तान आणि इराणच्या सेनेमध्ये काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना देखील वाढल्या आहेत. 2014 मध्ये जैश अल अदलने 5 इराणच्या गार्डसचं अपहरण केलं होतं त्यानंतर इराणने जर त्यांना सोडलं नाही तर आम्ही पाकिस्तानात घुसतांना देखील विचार करणार नाही असं म्हटलं होतं त्यानंतर एका स्थानिक सुन्नी धर्मगुरुच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपवला होता.