फ्रान्स : पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आयसीसने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मशीनगनद्वारे हल्लेखोरानं पोलिसांवर अंदाधूंद गोळीबार केलाय.  पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोरही ठार झाला.


दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं असून मध्यवर्ती भागात हेलिकॉप्टरद्वारे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.


फ्रान्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना हा हल्ला झाल्याने पॅरिसमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.