वॉशिंग्टन : अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात एकूण ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती एफपी या वृत्तसंस्थाचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे. अफागाणिस्तामधील ISIS तळावर अमेरिकेने हा हल्ला चढवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेकडून गुरूवारी एएफपी या वृत्तसंस्थेने अफगाणिस्तानमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अफगाणिस्तानमधील अचिन या जिल्ह्यात नानगरहर येथील ISISच्या तळावर बॉम्बहल्ला केला होता. या भागात ISIS अनेक मोठे नेते लपून बसल्याची माहिती अमेरिकेला मिळाली होती. 



या भागात ६०० ते ७०० दहशतवादी असल्याचा दावा अमेरिकी सैन्याने केला आहे. अमेरिकेने हल्ल्यासाठी पहिल्यांदाच सर्वात मोठ्या बिगर अण्विक बॉम्बचा वापर केला होता. मदर ऑफ ऑल बॉम्ब (एमओबी) असे या बॉम्बला संबोधले जाते. या हल्ल्यात काही भारतीय ठार झाल्याचे वृत्त आहे.