नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादमधली नियोजित सार्क परिषद संकटात सापडलीय. ही परिषद रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासह बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि भुतान यांनी परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ही परिषदच रद्द करण्यासाठी भारतानं कंबर कसलीय. सध्या सार्कचे अध्यक्ष असलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्ककमल दहल यांना भारतानं पत्र पाठवलंय.


सार्कमधल्या एकाही देशानं बहिष्कार टाकला तर परिषदच पुढे ढकलावी लागते, असा नियम आहे. या नियमावर बोट ठेवत भारतानं परिषद पुढे ढकलण्याची किंवा रद्द करण्याची मागणी केलीय.


चार देशांनी माघार घेतल्यानंतरही उरल्यासुरल्या देशांना घेऊन परिषद रेटण्याचा पाकिस्तानचा मानस होता. मात्र नेपाळी मीडियानं दिलेल्या बातम्यांनुसार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.