नवी दिल्ली : जपानने एनएसजीसाठी भारताला समर्थन देत चीनला मोठा धक्का दिला आहे. जपानने म्हटलं आहे की, अणू पुरवठादार गट एनएसजीमध्ये भारताची सदस्यता आणि उपस्थिती यामुळे अणू शक्तीचा अप्रसाराच मदत मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे की, 'आम्ही एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वासाठी भारतासोबत मिळून काम करतोय. या मुद्द्यावर आम्हाला भारतासोबत काम करत रहायचं आहे. कारण आम्हाला असं वाटतं की भारताच्या सहभागामुळे अणूच्या अयोग्य प्रसारासाठी मदत होईल. जपान सासाठी एनएसजीच्या इतर सदस्य देशांसोबत चर्चा करत राहिल.'


भारताने एनएसजीमध्ये सहभाग मिळावा म्हणून केलेल्या मागणीचं समर्थन करत जपानी अधिकाऱ्यांनी म्हटलं की, 'जपान सामान्य भावनेने भारताच्या सदस्यत्वासाठी इतर देशांना सही करण्यास सांगत राहिल.'