COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉस एन्जल्स  : तब्बल 25 हजार फूट उंचीवरून ल्यूक अॅकिन्स या व्यक्तीने उडी घेतली आहे.  पॅराशूटशिवाय २५ हजार फुटावरून उडी मारण्याचा विक्रम या व्यक्तीने नोंदवला आहे. 


लॉस एन्जल्समधील ल्यूक अॅकिन्स याने पॅराशूट घेतला नाही आणि विंगसूटचाही वापर केला नाही, त्याने 25 हजार फूट उंचीवरून उडी घेतली. ल्यूक यांच्या मते,   पॅराशुटचा वापर केल्यामुळे उडी मारण्याची जागा चुकू शकते. त्यामुळे त्याने पॅराशुटशिवाय उडी मारण्याचा निर्णय घेतला. 


विमानाच्या साहाय्याने त्याने ही उडी घेतली. जमिनीवर येताना त्याचा वेग जवळपास ताशी १९३ किमी होता. ल्यूकची ही कामगिरी पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि कुटुंबीय त्याठिकाणी उपस्थित होते. ल्यूकने आयर्नमॅन ३ चित्रपटातही भूमिका केलेली आहे.


 ल्यूक अॅकिन्स  हे ४२ वर्षांचे आहेत, या आधी त्यांनी १८ हजार फूट उंचीवरून उडी मारून विक्रम रचला होता. ल्यूक यांच्यासाठी जमिनीवर १०० चौरस फुटांची जाळी लावण्यात आली होती. त्या जाळीत ते खाली येऊन पडले.