सेक्स गुलाम बनण्यास नकार दिल्याने २५० मुलींची हत्या
ISIS चा क्रुर चेहरा पुन्हा एकदा पुढे आलाय. सेक्स गुलाम बनण्यास नकार दिल्याने २५० मुलींची हत्या घडवून आणलेय. मोसूलमध्ये हे हत्याकांड करण्यात आलेय.
लंडन : ISIS चा क्रुर चेहरा पुन्हा एकदा पुढे आलाय. सेक्स गुलाम बनण्यास नकार दिल्याने २५० मुलींची हत्या घडवून आणलेय. मोसूलमध्ये हे हत्याकांड करण्यात आलेय.
इसिसचा आदेश न मानणाल्याने हा अत्यंत क्रूरपणा करत उत्तर इराकमध्ये सेक्स गुलाम बनायला नकार देणाऱ्या २५० मुलींची हत्या केल्याचे पुढे आले आहे.
या मुलींना अतिरेक्यांबरोबर विवाबंधनामध्ये रहाण्याचा आदेश इसिसने दिला होता. हा सेक्स गुलामगिरीचा आदेश होता, असे सांगितले जात आहे. मात्र, ज्या मुलींनी नकार दिला त्यांची निदर्यतेने हत्या केली.
इसिसने मोसूलचा ताबा घेतल्यानंतर मुलींना निवडून त्यांच्यावर अतिरेक्यांबरोबर विवाह करण्यासाठी जबरदस्ती सुरु केली. पण ज्या मुलींनी नकार दिला त्यांची हत्या केली असे कुर्दीश लोकशाही पक्षाचे प्रवक्ते सैद मामुझिनी यांनी सांगितले.
सेक्शुअल जिहाद नाकारणाऱ्या आतापर्यंत २५० मुलींची इसिसने हत्या केली असून, काहीवेळा त्या मुलींच्या कुटुंबालाही संपवले, असे मामुझिनी यांनी यावेळी स्पष्ट केले.