अबुजा : हल्ली पॉवर बँक एक गरजेच्या गॅजेमध्ये सामील झालंय. चालता फिरता चार्जर म्हणून हल्ली सर्वच या गॅजेटचा वापर करतात. मात्र कधी कधी ही उपरकरणे तुम्हाला घातक ठरु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटना नायजेरियामध्ये एका मुलीसोबत घडलीये. ती झोपताना पॉवर बँक छातीवर ठेवून झोपली. यादरम्यान पॉवर बँक चार्ज होत होता. पॉवर बँक ओव्हरहीट झाल्याने तिला झोपेतच विजेचा जोरदार धक्का बसला आणि तिचा मृत्यू झाला. 


सकाळी तिचे आईबाबा तिला उठवण्यासाठी गेले असता झोपेतच तिचा मृत्यू झाल्याचे आढळले.