कॅन्सरशी लढण्यासाठी वडील पितात मुलीचे `ब्रेस्ट मिल्क`
कॅन्सरशी लढणारे टीम ब्राऊन आपला नाश्ता एका विचित्रपद्धतीने करतात. त्यांचा नाश्ता हा कॉर्नफ्लेक्स आणि आपल्या मुलीचे ब्रेस्ट मिल्क असते.
ब्रिटन : कॅन्सरशी लढणारे टीम ब्राऊन आपला नाश्ता एका विचित्रपद्धतीने करतात. त्यांचा नाश्ता हा कॉर्नफ्लेक्स आणि आपल्या मुलीचे ब्रेस्ट मिल्क असते.
जॉर्जिया ही २७ वर्षीय महिला आपल्या छोट्या बाळाला आपले दूध पाजल्यानंतर आपले दूध आपल्या वडिलांसाठी बाजूला काढते. वडिलांना कॅन्सरपासून लढण्यासाठी आणि त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अशा पद्धतीने ती आपले दूध वडिलांना देते. वडिलांना लिव्हरचा कॅन्सर आहे.
एक महिन्यानंतर असं झालं...
आपल्या मुलीचे ब्रेस्ट मिल्क प्यायल्यानंतर ६७ वर्षीय टीम ब्राऊन यांचा कॅन्सरचे प्रमाण कमी होऊ लागले.
कशी लागते टेस्ट...
टीम हे रिटायर टिचर आहे. आपल्या या उपचाराबद्दल बोलताना टीम म्हणाले, हे दूध जरा मोहचळ आणि तेलकट लागते. आता काही वेगळ वाटत नाही. या आता गाईच्या दुधात हे दूध मिक्स केल्यावर त्याची वेगळी टेस्ट लागत नाही.
माझं वेगळं बॉन्डिंग...
या वेगळ्या आणि विचित्र उपचाराबद्दल बोलताना, टीम ब्राऊन म्हणाले, की मला आता जॉर्जिया आणि तिचा मुलगा मॉन्टीशी वेगळी बॉन्डिंग झाल्यासारखे वाटते.
मुलीचं वाटतं असं...
टीम यांच्या मुलगी जॉर्जिया म्हणाली, मला या उपचाराबद्दल काही विचित्र वाटत नाही. मला वडिलांना मदत होते याबद्दल बरं वाटतं आहे. माझी आई आणि माझे नातेवाईक माझ्या पाठिशी आहे. त्यांना वाटते हे जरा मजेशीर आहे.
कधी झाला कॅन्सर...
टीम यांना जॉर्जियाचे लग्न होण्याच्या एक वर्षापूर्वी २००७ मध्ये कॅन्सर झाल्याचे डिटेक्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन केले आणि ट्यूमर काढले. एक वर्ष त्यांनी केमो थेरिपी घेतली. पण त्यांचा आजार पुन्हा बळावला.
कशी सुचली कल्पना
टीम यांचा कॅन्सर जॉर्जिया प्रेग्नंट असताना बळावला. मग जॉर्जियाचा मुलगा मॉन्टी एक महिन्याचा असताना जॉर्जिया एक टीव्ही डॉक्युमेंट्री पाहिली त्यात ब्रेस्ट मिल्कचे फायदे सांगितले होते.
माणसाने प्रोस्टॅट कॅन्सर बरा करण्यासाठी ब्रेस्ट मिल्क दररोज प्यायले तर त्याचा ट्यूमर कमी होतो. असे सांगितले हे वडिलांना सांगितले आणि आम्ही उपचार सुरू केला. टीमच्या डॉक्टरांनी याला पाठिंबा दिला. चमत्कार म्हणजे टीमची प्रकृती सुधारू लागली.
यापूर्वी असे घडले नाही...
वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड युके नुसार, आम्हांला अशा प्रकारे ब्रेस्ट मिल्कने कॅन्सर बरा होतो याबद्दल ऐकले नव्हते किंवा तसे पुरावेही नाही.