`सर्जिकल स्ट्राईक`नंतर पाक पंतप्रधानांच्या मुलीचं ट्विट...
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं `सर्जिकल स्ट्राईक` देऊन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय.
नवी दिल्ली : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'सर्जिकल स्ट्राईक' देऊन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय.
भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दोन मृत जवानांचे फोटोही शेअर केलेत. यासोबतच त्यांनी लिहिलंय 'पाकिस्तानचे मुलं'...
आपण हल्ल्याला सुरुवात करू नये पण गरज पडली तरी चोख प्रत्यूत्तर देऊ, असंही मरियम यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
यानंतर पाकिस्तानातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भारताची सर्जिकल स्वीकारावी किंवा नाही... आणि स्वीकारावी तर कशी? असे अनेक प्रश्न पाकिस्तानसमोर होते. पाकिस्तानचे केवळ दोन सैनिक भारताच्या हल्ल्यात शहीद झालेत, असं पाकिस्ताननं गुरुवारी म्हटलं होतं... तर भारतानं मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ३५-४० दहशतवाद्यांना ठार केल्याचं म्हटलंय.