वॉशिंग्टन : बराक ओबामा यांचे 100 राष्ट्रपती म्हणून दिवस बाकी आहेत. यादरम्यान एका अमेरिकन संघटनेने सरकारला सल्ला दिला आहे की, 100 दिवसाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नव्या राष्ट्राध्यक्षांची भेट घालून द्या. दोन्ही देशांमधील संबंध अजून चांगले होण्यासाठी हे महत्त्वाचं असल्याचं या संघनेने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांना आग्रह केला आहे की, त्यांनी निश्चित करावं की, भारतासोबत त्यांना चांगले संबंध कसे ठेवता येतील.


रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे की, 'अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या नेतृत्वात सुरक्षा संवाद स्थापन करुन पुढच्या सरकारने ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपानसोबत मिळून काम केलं पाहिजे. या संवादामध्ये पॅसिफिक आणि हिंदी महासागराच्या क्षेत्रात हिताच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. सरकारने 100 दिवसाच्या आत नवे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान यांच्यातील संवाद घडवून आणला पाहिजे आणि चांगले संबंध तयार केले पाहिजे.