मेक्सिको : विदेशातील जनता, जनप्रतिनिधी आणि विदेशातील नेत्यांमध्ये कोणत्याही पंतप्रधानाबाबत ऐवढी क्रेज दिसली नाही जेवढी मोदींच्या वाट्याला आली. स्टॅडिंग ओवेशन, ऑटोग्राफ तर कधी हात मिळवण्याची इच्छा. असं काही सगळं सध्या मोदींबाबत विदेशात घडतंय.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तित्व जगातील मोठ्या-मोठ्या नेत्यांना देखील आकर्षित करतोय. भारतीय पंतप्रधानांशी  मॅक्सिकोचे राष्ट्रपती एनरिक पेना इतके प्रभावित झाले की त्यांनी सगळे प्रोटोकॉल्स तोडत मोदींची कार ड्राईव्ह केली. राष्ट्रपती ड्राइविंग सीटवर बसले होते आणि पंतप्रधान मोदी त्यांच्या बाजुला. ते स्वत: आज मोदींना जेवनासाठी घेवून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काही दिवसांपूर्वी जो देश एनएसजीमध्ये भारताच्या सहभागाला विरोध करत होता त्याच देशाचे राष्ट्रपती मोदींसाठी कार ड्राईव्ह करतांना दिसत आहे. या नक्कीच संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. मोदींनी आपल्या विदेश दौऱ्यातून भारतासाठी जेवढ्या गोष्टी मिळवल्या तेवढ्या आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी मिळवलं नसल्याचं राजकिय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.