लॉस एंजेलिस : जगप्रसिद्ध पॉप स्टार मायकेल जॅक्सन जरी या जगात नसला तरी आजही त्याची कमाई मात्र भरपूर आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या दिवंगत सेलिब्रेटींच्या यादीत सलग चौथ्या वर्षी तो अव्वल स्थानी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्स मॅगझिनच्या माहितीनुसार, 2009मध्ये मायकेल जॅक्सनचा मृत्यू झाला. गेल्या 12 महिन्यांत दिवंगत मायकेल जॅक्सनने तब्बल 82.5 करोड डॉलर(साधारण 5521 कोटी रुपये) ची कमाई केलीये. यात सोनी/एटीवी म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगमध्ये पॉप गायकचा हिस्सा विकल्यानंतर तब्बल 75 कोटी डॉलर मिळाले. 


सर्वाधिक कमाई करणाऱ्या दिवंगत सेलिब्रेटींच्या यादीत दुसऱ्या स्थानी अमेरिकेचे कार्टूनिस्ट चार्ल्स शाल्ज आहेत. त्यांची कमाई 4.8 कोटी डॉलर इतकी होती. तिसऱ्या स्थानी महान गोल्फ खेळाडू  अर्नाल्ड पामर आहेत.