नवी दिल्ली : पाकिस्तानी सेनाने नवाज शरीफ सरकारसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. 14 ऑक्टोबरला झालेल्या कॉर्प्स कमांडर बैठकीत नवाज शरीफ आणि सेना यांच्यात सर्वकाही सुरळीत नसल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी ही माहिती बाहेर आली. गुप्त बैठकीची माहिती बाहेर आल्याने सेनेने पंतप्रधान कार्यालयाला दोषी ठरवलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेनेने ५ दिवसात ही माहिती बाहेर कशी आली याची चौकशी करण्यासाठी सांगितलं. ५ दिवसाच्या या डेडलाइनमध्ये नवाज शरीफ यांच्या कार्यालयातून माहिती देणाऱ्या अलमिदा यांना देश सोडून बाहेर जाण्यास बंदी घातली पण नंतर ती त्यांनीच हटवली.


२०१४ मध्ये पाकिस्तानने सत्ता पालट करण्याचा प्रयत्न केला होता. सेनेने विदेश मंत्रालयासह सगळ्या प्रमुख विभागांना त्यांच्या अधिकाराखाली आणलं होतं. पण त्यावेळेस नवाज शरीफ यांना आपली सत्ता वाचवण्यात यश आलं होतं. नवाज शरीफ यांच्यापुढे आता पुन्हा तेच दिवस येणार असं दिसतंय. सेना कोणत्याही क्षणी नवाज शरीफ यांना सत्तेतून खाली आणू शकते.