बोको हरामचा तळ समजून नायजेरियन वायूसेनेचा हल्ला, १०० निष्पापांचा बळी
नायजेरिया हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकीने निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे पन्नास जणांचा बळी गेलाय. बोको हराम या दहशतवादी संघटनेचा बिमोड करण्यासाठी सुरु असलेल्या कारवाई दरम्यान ही घटना घडलीय.
अबुजा : नायजेरिया हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकीने निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात १०० निष्पापांचा बळी गेलाय. बोको हराम या दहशतवादी संघटनेचा बिमोड करण्यासाठी सुरु असलेल्या कारवाई दरम्यान ही घटना घडलीय.
लष्करी कमांडर मेजर जनरल लकी इराबॉर यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. बोको हरामच्या दहशतवाद्यांची जमवाजमव होत होती असा संदेश मिळाल्यानंतर इराबॉर यांनी त्यांचा खात्मा करण्याची मोहीम आखली होती. मात्र ही चूक कशी घडली याची आता चौकशी होणार आहे.
इराबॉर हे दहशतवादविरोधी कारवायांचे थिएटर कमांडर आहेत. ईशान्येकडील कॅमेरुन सीमेजवळ हा अपघाती हल्ला झाला. नायजेरियाच्या लष्कराने पहिल्यांदाच अशी चूक मान्य केल्याचं बोललं जातंय.