मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोशल नेटवर्किंग प्रेम तर जगजाहीर आहे. याचाच प्रत्यय आता इन्स्टाग्रामवरही आला आहे. इन्स्टाग्रामवर नरेंद्र मोदी नेत्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इन्स्टाग्रामवर 1.7 मिलीयन फॉलोअर्स आहेत. नेत्यांच्या या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा एक नंबरवर आहेत. ओबामांचे इन्स्टाग्रामवर 6 मिलीयन फॉलोअर्स आहेत, तर रशियाचे पंतप्रधान डिमीट्री मड्वेडेव 2 मिलीयन फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 


17 फेब्रुवारीपर्यंत मोदींनी इन्स्टाग्रामवर 206 फोटो पोस्ट केले आहेत, तर ओबामांनी तब्बल 206 फोटो पोस्ट केले आहेत. भारताचं परराष्ट्र मंत्रालयही जगभरातल्या इन्स्टाग्रामवरच्या ऍक्टीव्ह नेत्यांमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे.


 सोशल नेटवर्किंगवर मोदींचं हे काही पहिलंच रेकॉर्ड नाही. याच वर्षी मोदी फेसबूकवर दुसरे मोस्ट पॉप्युलर नेते झाले आहेत. या यादीमध्येही ओबामाच एक नंबरवर आहेत. तर ट्विटरवर नरेंद्र मोदींचे 18 मिलीयन फॉलोअर्स आहेत.