आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्ज

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.   

May 31, 2024, 20:43 PM IST

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे. 

 

1/11

व्हिएतनाममधील वाहन निर्माता कंपनी VinFast ने नुकतंच भारतात आपला प्लांट उभारण्यास सुरुवात केली आहे. लवकरच येथे वाहन निर्मिती सुरु होणार आहे. 

2/11

याआधी कंपनीने  आपली नवी इलेक्ट्रिक कार vinfast vf 3 च्या स्पेसिफिकेशनचा डेटा शेअर केला आहे. व्हिएतनाममध्ये आधीच या कारचं बुकिंग सुरु झालं आहे.   

3/11

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.   

4/11

कारची लांबी 3190 मिमी, रुंदी 1679 मिमी, उंची 1622 मिमी आहे. यामध्ये 2075 मिमीचा व्हीलबेस मिळतो. ही गाडी आकारात अल्टोपेक्षाही छोटी आहे, जिची लांबी 3445 मिमी आहे.   

5/11

आकारात छोटी असली तरी कंपनी छोटी एसयुव्ही म्हणून हिचं मार्केटिंग करत आहे. MG Comet च्या तुलनेत ही 216 मिमी जास्त लांब, 174 मिमी रुंद आणि 18 मिमी छोटी आहे.   

6/11

कारला दोन दरवाजे असून 191 मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स आहे. यात 16 इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत.   

7/11

कारच्या मागील बाजूला रिअर माऊंटेड इलेक्ट्रिक मोटर असेल, जी 43.5hp ची पॉवर आणि 110Nm चा टॉर्क जनरेट करेल. ही कार फक्त 5.3 सेकंदात ताशी 50 किमी वेग पकडण्यात सक्षम आहे.   

8/11

या मिनी एसयुव्हीत 18.64kWh क्षमतेचा लिथियम-ऑयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो सिंगल चार्जमध्ये 210 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो.   

9/11

VinFast ने सामान्य सॉकेटला लावून तुम्ही कार चार्ज करु शकता असं सांगितलं आहे. ही बॅटरी फक्त 36 मिनिटात 10 पासून 70 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.  

10/11

VinFast VF3 ची किंमत 322 मिलियन व्हिएनतनाम चलन आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत 10 लाख 54 हजार इतकी होते.   

11/11

VinFast भारतीय बाजारपेठेत वेगाने प्रवेश करत आहे. सुरुवातीला कंपनी बिल्टअप मॉडेल सादर करणार आहे. दरम्यान VF3 भारतात लाँच होणार की नाही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.