नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी सौदी अरेबियाने सौदीचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द किंग अब्दुलअझीज साश' देऊन गौरव केला. सौदी अरेबियाचे राजे अब्दुलअझीज अल सौद यांच्या नावावरुन या किताबाचे नामकरण करण्यात आले आहे. आधुनिक सौदी साम्राज्याचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी राजांच्या राजदरबारात राजे सलमान बिन अब्दुलअझीज यांनी मोदींना हा किताब बहाल केला. त्यानंतर मोदी आणि राजे सलमान यांच्यात विविध विषयांवर चर्चाही झाली. यात अनेक द्विपक्षीय करार करण्यात आले.


यापूर्वीही काही जागतिक नेत्यांना हा किताब मिळाला आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे, ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा या यादीत समावेश आहे.